Comprehension Passages


त्सुनामी त्सुनामी म्हणजे समुद्रातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर आदळताना तयार होणारी लाटांची मालिका होय. भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे त्सुनामी निर्माण होऊ शकतात. त्सुनामी हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ "बंदरातील लाटा" असा आहे. हा शब्द कोळ्यांत प्रचलित होता. मासेमारी करून परत आलेल्या कोळ्यांना संपूर्ण बंदर नाश पावलेले दिसे, पण समुद्रात लाटा दिसत नसत, त्यामुळे हे नाव देण्यात आले. किनाऱ्यापासून दूर समुद्रात या लाटांची उंची जास्ती नसते पण लांबी जास्ती असते. त्यामळे त्या दिसून येत नाहीत. परंतु जेव्हा या लाटा किनाऱ्याजवळ येतात त्यावेळी मात्र त्यांची उंची वाढते व लांबी कमी होते. या बलाढ्य लाटा आदळल्याने किनारपट्टीचे नुकसान होते. मॅनग्रोव्हची वने व प्रवाळ बेटे (coral islands) नैसर्गिकरीत्या त्सुनामीच्या तडाख्यापासून संरक्षण करतात. पहिली त्सुनामीची नोंद ग्रीसमध्ये ई. स. पू. ४२६ साली झाली. ई. स. २००४ मध्ये आग्नेय आशियात, हिंदी महासागरात त्सुनामी आली होती. डिसेंबर २६, २००४ रोजी मध्यरात्री च्या सुमारास सुमात्रा बेटाजवळील समुद्रामध्ये तीव्र भूकंप झाला. त्यातून उद्भवलेल्या लाटांमुळे त्सुनामी निर्माण झाली. या त्सुनामीने इंडोनेशिया, थायलंड,भारत, बर्मा, मादागास्कर, श्रीलंका या देशांना फटका बसला. ही नैसर्गिक आपत्ती इतिहासात सर्वात भयानक व नुकसानकारक ठरली. त्यात अंदाजे २,२७,९८८ लोकांचा बळी गेला. १) त्सुनामी हे नाव कसे पडले? उत्तर - मासेमारी करून परत आलेल्या कोळ्यांना संपूर्ण बंदर नाश पावलेले दिसे, पण समुद्रात लाटा दिसत नसत. त्यावरून त्सुनामी नाव पडले. २) त्सुनामी म्हणजे काय? उत्तर - त्सुनामी म्हणजे समुद्रातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर आदळताना तयार होणारी लाटांची मालिका होय. ३) त्सुनामी निर्माण कशी होते? उत्तर - भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे त्सुनामी निर्माण होते. ४) २००४ साली झालेल्या त्सुनामी चे वर्णन करा. उत्तर - २००४ साली आलेल्या भूकंपामुळे मोठया लाटा निर्माण होऊन त्सुनामी आली. आणि त्या त्सुनामीने इंडोनेशिया, थायलंड, भारत, बर्मा, मादागास्कर आणि श्रीलंका या देशांना फटका बसला. ५) मॅनग्रोव्हची वने व प्रवाळ बेटे (coral island) त्सुनामीच्या तडाख्यापासून किनारपट्टीचे संरक्षण कशी करत असावीत? उत्तर - मॅनग्रोव्ह वने आणि प्रवाळ बेटे (coral island) त्सुनामी आली कि त्याने होणारे नुकसान नैसर्गिकरीत्या कमी करतात. त्यामध्ये असेलली झाडे आणि त्यांची मुळे त्सुनामीचा जोर कमी करतात. शेतीचा शोध खूप प्राचीन काळी शेतीचा शोध लागण्यापूर्वी माणूस भटके जीवन जगत होता. त्या काळी, जगण्यासाठी तो प्राण्याची शिकार आणि कंदमुळे यांच्यावर अवलंबून होता. पुढे माणूस शेती करू लागला. शेती करण्यासाठी पाण्याची गरज असल्याने तो पाण्याजवळ वस्ती करून राहू लागला. त्या ठिकाणी अनेक माणसे घरे बांधून राहू लागली. एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यातून गावे निर्माण झाली. शेतीच्या शोधानंतर माणसाची कामे वाढली. शेतीसाठी अवजारे तयार करणे, त्यांची दुरुस्ती करणे, कापड विणणे, मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर तयार झाले. शेतीसाठी माणसे बैल पाळू लागली. मालाची वाहतूक करण्यासाठी बैलगाड्यांचा वापर व्हायला लागला. गायी, म्हशी पाळल्यामुळे दूध मिळायला लागले. कुत्रे पाळल्यामुळे घराची, शेतीची राखण व्हायला लागली. इकडून तिकडे जाण्यासाठी घोड्याचा वापर होऊ लागला. १) शेती करण्याआधी माणूस कशावर जगत असे? उत्तर - शेती करण्याआधी माणूस भटके जीवन जगत असे. जगण्यासाठी तो प्राण्याची शिकार आणि कंदमुळे यांच्यावर अवलंबून असे. २) गावे कशी निर्माण झाली? उत्तर - शेती करण्यासाठी पाण्याची गरज असल्याने माणूस पाण्याजवळ वस्ती करून राहू लागला. त्या ठिकाणी अनेक माणसे घर बांधून राहू लागली. एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. आणि त्यातून गावे निर्माण झाली. ३) शेतीच्या शोधामुळे माणसाचा जीवनपद्धतीत कोणता बदल झाला? उत्तर - शेतीच्या शोधामुळे माणसांची कामे वाढली. माणसे बैल पाळू लागली, माल वाहून नेण्यासाठी बैलगाड्यांचा वापर करू लागली. म्हशी पाळल्यामुळे दूध मिळायला लागले. कुत्रे पाळल्यामुळे घराची, शेतीची राखण व्हायला लागली. इकडून तिकडून जाण्यासाठी घोड्याचा वापर होऊ लागला. ४) प्राचीन शब्दाचा अर्थ काय आहे? वाक्यात उपयोग करा? उत्तर - प्राचीन या शब्दाचा अर्थ आहे जुने किंवा आदिम ५) तुम्ही एकमेकांच्या सहकार्यांना कोणते काम केले आहे? उत्तर - आम्ही आमच्या शाळेत पुस्तकांचे प्रदर्शन भरवले होते आणि त्यातून जमलेले पैसे अनाथाश्रमाला दान दिले. गुलाब आमच्या ताईला गुलाबाचा सुगंध भारी प्रिय. मागच्या सुट्टीत तर तिने कमालच केली! गुलाब या विषयावर संशोधन करून एक लेखही लिहून टाकला. मग काय, आमची पूर्ण सुट्टी गुलाबी झाली!ताईने भाषण दिले. "बंड्या तुला माहित आहे का? गुलाबाच्या १००० हून जास्ती जाती आहेत! फुलांचा आकार दोन इंचांपासून ते वीस इंचांपर्यंत असू शकतो. गुलाबाच्या पाकळ्या मुलायम पण झुडूप मात्र काटेरी असते. गुलाबाचे अनेक रंग व मिश्र जाती असतात. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे, तर पिवळा गुलाब मैत्रीचे, गुलाबी गुलाब आनंदाचे, नारिंगी गुलाब उत्साहाचे,व पांढरा गुलाब पवित्रतेचे प्रतीक आहे."मग मीपण जाहीर केले, "माहीतेयना! गुलाबपासून बनवलेले अत्तर प्रसिद्ध आहे.आपल्या घरात सध्या तर घमघमाट असतो! शिवाय गुलाबपासून बनवलेला गुलकंद पौष्टिक असतो."त्यावर ताई उद्गारली, "अरे बंड्या! गुलाबाचे झुडूप अनेक वर्षे जगू शकते. जर्मनीमधल्या एक् चर्चच्या भिंतीवर वाढलेले गुलाबाचे झाड १००० वर्षे जगले आहे!मग मी पण म्हणालो, "भारतात गुलाब हे मुलीचे नाव असते, असेच अमेरिकेत रोझ हेपण मुलीचे नाव असते." ताईने माझ्याकडे डोळे वटारून बघितले!१) ताई ला कसला नाद लागला होता ?उत्तर -ताईला गुलाबाचा नाद लागला होता. २) गुलाबपासून काय बनवतात ?उत्तर - गुलाबपासून अत्तर व गुलकंद बनवला जातो. ३) गुलाबाच्या रंगाचे महत्व काय आहे ?उत्तर - लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे, पिवळा गुलाब मैत्रीचे, गुलाबी गुलाब आनंदाचे, नारिंगी गुलाब उत्साहाचे, व पांढरा गुलाब पवित्रतेचे प्रतीक आहे. ४) "मग काय आमची पूर्ण सुट्टी गुलाबी झाली!" असे का म्हण्टले आहे?उत्तर - वरील उताऱ्यात जी मुलगी आहे तिला गुलाब हे फुल खूप आवडते म्हणून तिने तिची पूर्ण सुट्टी गुलाब या फुलाविषयी माहिती गोळा केली आणि त्यामुळे तिच्याबरोबर असलेल्या तिच्या भावाने पण तिला मदत केली. म्हणून त्याची पूर्ण सुट्टी गुलाबी झाली असे म्हण्टले आहे. ५) ताईने माझ्याकडे डोळे वटारून बघितले! म्हणजे काय ?उत्तर - ताईने माझ्याकडे डोळे वटारून बघितले म्हणजे रागाने बघितले. माऊंट ऐव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वत नेपाळ मध्ये आहे - माऊंट एअवरेस्ट. माऊंट ऐव्हरेस्टला नेपाळी भाषेत 'सागरमाथा' म्हणतात. त्याची समुद्रसपाटीपासून उंची आहे - २९,०२९फूट. एव्हरेस्ट वर चढण्याकरता गिर्यारोहक उन्हाळ्यात नेपाळमध्ये येतात. एव्हरेस्टवर चढण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग आग्नेय दिशेने नेपाळमधून आहे. हा मार्ग सर्वसामान्य आहे. दुसरा मार्ग उत्तरेला तिबेटमधून आहे. एवरेस्ट वर चढताना ऑक्सिजनचा दाब कमी असल्याने, गिर्यारोहकांना श्वास घ्यायला त्रास होतो. म्हणून ते ऑक्सिजन सिलेंडर बरोबर नेतात. शिवाय जोराचा वारा, हिमवृष्टी व हिमलोट ह्यांना पण गिर्यारोहकांना सामोरे जावे लागते. न्यूझीलंड चे एडमंट हिलरी आणि नेपाळी शेर्पा तानसिंग नोर्गे, ही जोडी पाहिलांदा २९ मे, १९५३ ला सकाळी ११.३० वाजत एव्हरेस्टच्या शिखरावर पोहचली. पहिली महिला, जपानी जुंन्को ताबेई, १६ मे १९७५रोजी एवरेस्टच्या शिखावर पोहचली. रिन्होल्ड मेस्सनेर हा पहिला गिर्यारोहक होता, ज्याने ऑक्सिजन सिलेंडर न वापरता एव्हरेस्टचे शिखर गाठले. आता पुष्कळ गिर्यारोहक ऑक्सिजन सिलेंडर न वापरता एव्हरेस्ट चढतात. १) जगातील सर्वात उंच पर्वत कुठे आहे व त्याचे नाव काय आहे? उत्तर - जगातील सर्वात उंच पर्वत नेपाळ येथे आहे. त्याचे नाव आहे माऊंट एव्हरेस्ट. २) उंच पर्वत चढताना काय अडचणी येतात? उत्तर - उंच पर्वत चढताना गिर्यारोहकांना श्वास घायला त्रास होतो. तसेच जोराचा वारा, हिमवृष्टी,आणि हिमलोट यांना पण सामोरे जावे लागते. ३) एव्हरेस्ट वर चढण्याचे किती मार्ग आहेत व ते कुठे आहेत? उत्तर - एव्हरेस्ट वर चढण्याचे दोन मार्ग आहेत. एक आग्नेय दिशेने नेपाळमधून आहे. आणि दुसरा उत्तरेला तिबेटमधून आहे. ४) एव्हरेस्टच्या शिखरावर पहिल्यांदा कोण व कधी पोहचले? उत्तर - न्यूझीलंडचे एडमंड हिलरी आणि नेपाळी शेर्पा तेनसिंग नोर्गे हि जोडी पहिल्यांदा २० मे, १९५३ ला सकाळी ११.३० वाजता एव्हरेस्ट च्या शिखरावर पोहचले. ५) वरील उताऱ्याची मुख्य संकल्पना / main idea काय आहे? उत्तर - वरील उताऱ्याची मूळ संकल्पना माउंट एव्हरेस्ट बद्दल माहिती करून देणे ही आहे. हत्तीचे पिल्लू हत्तीचे पिल्लू बावीस महिन्यांनी जन्माला येते. पहिल्या तीन चार तासांनी आई पिल्लाला हळूहळू उभे राहायला शिकवते. सुरवातीला आपल्या सोंडेचे काय करावे ते त्याला काळात नाही, मग लहान मुले जशी तोंडात बोटे घालतात तसे आपल्याच सोंडेचे टोक ते तोंडात घालून बघते. साधारण तीन महिन्यात ते सोंडेने गवत उचलायला शिकते. हत्तीची पिल्ले एकमेकांवर गवत फेकणे, सोंडेने पाणी फवारणे, चिखलात खेळणे असे खेळ खेळतात. हत्ती लहानपणापासूनच ज्या ज्या प्रदेशातून गेलेले असतात त्याचे नकाशे त्यांच्या मेंदूत नोंदवले जातात. त्याप्रमाणे ते प्रवास करतात. हत्तींचे अनेक कळप एकमेकांना भेटतात व बरोबर प्रवास करतात. शरीराच्या हालचालीतून, स्पर्शातून, वेगवेगळे आवाज काढून ते आपले विचार दुसऱ्यांना सांगतात. आपले सुळे एकमेकात अडकवून सोंडेने आपले प्रेम दाखवतात. हत्ती हा कळपात राहणारा व कुटुंबात रमणारा असा शाकाहारी प्राणी आहे. प्रश्न - १) हत्तीची आई आपल्या पिल्लाला केंव्हा चालायला शिकवते ? उत्तर - हत्तीची आई आपल्या पिल्लाला तीन चार तासांनी चालायला व उभे राहायला शिकवते. २) हत्तीचे पिल्लू सोंडेच्या टोकाने काय करत असते ? उत्तर - हत्तीचे पिल्लू सोंडेचे टोक आपल्याच तोंडात घालून बघते. ३)हत्तीचे पिल्लू कोणते खेळ खेळते ? उत्तर - हत्तीचे पिल्लू एकमेकांवर गावात फेकणे, सोंडेने पाणी फवारणे, आणि चिखलात खेळणे असे खेळ खेळतात. ४) हत्ती आपले विचार दुसऱ्यांना कसे सांगतात ? उत्तर - शरीराच्या हालचालीतून, स्पर्शातून, वेगवेगळे आवाज काढून हत्ती आपले विचार दुसऱ्यांना सांगतात. ५) हत्ती शाकाहारी प्राणी आहे की मांसाहारी ? उत्तर - हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे. युआन श्यांग इ. स. ६३० च्या सुमारास युआन श्यांग हा चिनी प्रवासी भारतात आला. त्याने बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता. मूळ धर्मग्रंथांचा चाअभ्यास करावा म्हणून तो भारतात आला. दोन वर्षे काश्मीरमध्ये राहून त्याने अनेक धर्मग्रंथ वाचले. नंतर तो मगध देशातील (आजचे बिहार) नालंदा विद्यापीठात आला. तेथे खूप मोठे ग्रंथालय होते. तेथे दहा हजार विद्यार्थ्यांची राहण्याची आणि शिकण्याची सोय होती. तेथील अनेक ग्रंथांचा त्याने चिनी भाषेत अनुवाद केला. महाराष्ट्रात युआन श्यांगने अजिंठा व वेरूळ येथील सुंदर लेणी पहिली. महाराष्ट्रातील लोकांविषयी तो म्हणतो, "संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणांची पर्वा न करता ते मदत करतात". चीनमध्ये परत जाताना त्याने साडेसहाशे ग्रंथ व भगवान बुद्धाच्या अनेक मूर्ती आपल्याबरोबर नेल्या. त्या काळात तो भारतात पंधरा वर्षे राहिला. चीनमध्ये गेल्यावर त्याने बरोबर आणलेल्या संस्कृत ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतरे केली. 'पश्चिम देशाची कथा' ह्या नावाचे पुस्तक लिहिले. त्यात भारतातील प्रवासाचे वर्णन आहे. प्रश्न - १) युआन श्यांग कोणत्या देशाचा प्रवासी होता? उत्तर - युआन श्यांग हा चिनी देशाचा प्रवासी होता. २) हा भारतात कशासाठी आला होता? उत्तर - मूळ धर्मग्रंथांचा अभयास करण्यासाठी तो भारतात आला होता. ३) नालंदा येथे त्याने काय केले? उत्तर - नालंदा येथे त्याने अनेक ग्रंथांचा चिनी भाषेत अनुवाद केला. ४) महाराष्ट्रात त्याने काय पहिले? उत्तर - महाराष्ट्रात त्याने अजंठा व वेरूळ येथील सुंदर लेणी पहिली. ५) चीनमध्ये आपल्याबरोबर तो काय बरोबर घेऊन गेला? उत्तर - चीनमध्ये जाताना तो आपल्याबरोबर साडेसहाशे ग्रंथ व भगवान बुद्धांच्या अनेक मूर्ती घेऊन गेला. झाडे सजीव असतात झाडे सजीव असतात हे जगदीशचंद्र बोस ह्यांनी सिद्ध केले. झाडांची रोपे बियांपासून तयार होतात. रोपांची वाढ होऊन मोठी झाडे बनतात. झाडे हालचाल करतात पण त्या हालचाली सहज लक्षात येत नाहीत. कळीचे फुल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात. झाडांची मुळे जमिनीत जातात. त्यामुळे झाडे प्राण्यांप्रमाणे इकडे तिकडे जाऊ शकत नाहीत. झाडाच्या वाढीला योग्य तेवढे खत व पाण्याची गरज असते. झाडांची मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात. हे पाणी झाडांच्या पानापर्यंत पोचते. पानावर छोटी छोटी छिद्र असतात. त्यातून हवा पानांच्या आत शिरते. पानांवर सूर्यप्रकाश पडला की हवा आणि पाणी यांपासून झाडे आपले अन्न बनवतात प्रश्न - १) झाडे सजीव असतात असे कोणी सिद्ध केले? उत्तर - झाडे सजीव असतात हे जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केले. २) झाडे का चालू शकत नाहीत? उत्तर - झाडांची मुळे जमिनीत जातात त्यामुळे झाडे चालू शकत नाहीत. ३) झाडांच्या वाढीला कशाची गरज असते? उत्तर - झाडांच्या वाढीला योग्य तेवढे खात व पाण्याची गरज असते. ४) झाडे पाणी कुठून आणतात? उत्तर - झाडांची मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात. ५) झाडांना आपले अन्न तयार करण्यासाठी काय काय लागते? उत्तर - झाडांच्या पानांवर सूर्यप्रकाश पडला की हवा आणि आपणि यांपासून झाडे आपले अन्न बनवतात.
पत्र लेखन


प्रिय आईस, पत्र लिहिण्यास कारण कि, तुला माहिती आहेचस कि मी गेल्या आठवड्यात वॉशिंग्टन डी सी येथे शालेय सहलीतून गेलो होतो. जाताना तू मला ५० डॉलर दिले होतेस. मी त्यातले २० डॉलर खर्च केले आणि बाकीचे नीट पाकिटात दुमडून ठेवले होते. आणि पाकीट नीट खिशात ठेवले होते. पण शेवटच्या दिवशी मी एक वस्तुसंग्रहालय बघायला गेलो तिथे माझा फोन खिशातून बाहेर काढताना बहुदा माझे पाकीट बाहेर पडले आणि हरवले. मी जेव्हा एअरपोर्ट ला पोहचलो त्यावेळी माझ्या लक्षात आले. पण तेव्हा खूप उशीर झाला होता. ते वस्तुसंग्रहालय बंद झाले होते. मी घरी आल्यावर तिथे फोन केला. आणि त्यांनी सांगितलंय कि जर त्यांना ते मिळाले तर ते मला पाठवून देतील. आपला पत्ता त्या पाकिटात कागदावर लिहिला आहे. मला कृपा करून क्षमा कर. माझ्याकडून अशी चूक पुन्हा नाही होणार. मी नेहमी जबाबदारीने वागेन. तुझा आर्यन
मराठी निबंध


मुलांकडे सेलफोन असण्याचे फायदे आणि तोटे आजकाल सेलफोन जवळ बाळगणे ही एक मोठी गरज झाली आहे. त्यामुळे आपण एकमेकांशी जोडलेले राहू शकतो. पण सेलफोन जवळ बाळगण्याचे काही वय निश्चित असावे असे मला वाटते. कारण लहान मुलांना जर आपण सेलफोन घेऊन दिला तर दिवसभर ते गेम खेळत राहतील. त्यामुळे त्यांचे डोळे लवकर खराब होऊ शकतात. त्यांना चष्मा लागू शकतो. तसेच त्या सगळ्याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. बऱ्याचशा शाळांमध्ये मुलांना सेलफोन आणायला परवानगी नसते. पण जर तरी मुलांनी शाळेत सेलफोन नेले तर त्यांना शिक्षा होऊ शकते. पण त्याचबरोबर सेलफोन जवळ असण्याचे फायदे पण बरेच आहेत. मुले आईवडिलांच्या संपर्कात राहू शकतात. क्लास लवकर सुटला किंवा शाळा लवकर सुटली तर मुले आईवडिलांना संपर्क करू शकतात. तर त्यांना वाटले कि ते संकटात आहेत ते पटकन पालकांना फोने करून बोलावून घेऊ शकतात . हल्ली सेलफोन मुळे आईवडिलांना मुलांचे ठिकाण पण कळू शकते. सेलफोन असण्याचे फायदे आणि तोटे दोनही आहेत. पण त्याचा गैरवापर आपण टाळला पाहिजे. गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गणेश चतुर्थी येते. या दिवशी गणपतीला वाजत गाजत घरी आणतो. त्याची यथासांग पूजा करतो. काही जण गणपती दीड दिवस ठेवतात, काही पाच दिवस तर काही गौरी गणपती म्हणजे सहा किंवा सात दिवस ठेवतात. गणपतीला लाल फुले खूप आवडतात. म्हणून आपण त्याला जास्वंदीची फुले वाहतो. गणपतीला मोदक पण खूप आवडतात. तसेच दिवसातून दोन वेळा गणपतीच्या आरती पण आपण म्हणतो. लहान मुलांना गणपती खूप आवडतो. गणपती आपण जिथे ठेवतो त्याच्या आजूबाजूला आपण सजावट करतो. काही सार्वजनिक गणपती मंडळे ही सजावट खूप मोट्ठी आणि सुंदर करतात. ते बघायला खुप मोट्ठी रांग असते. लोक तासंतास रांगेत उभे राहतात. लोकमान्य टिळकांनी प्रथम सार्वजनिक गणपतीची प्रथा सुरु केली. सर्व लोकांनी एकत्र येऊन, विचारांचे आदानप्रदान करावे म्हणून याची सुरवात झाली. आज खूप लोक आपापल्या घरांमध्ये पण गणपती आणतात. गणपती हा एक खूप मोठ्ठा हिंदूंचा सण आहे. नागपंचमी नागपंचमी हा हिंदूंचा सण आहे. नागपंचमी ही श्रावण महिन्यामध्ये येते. या दिवशी नागाची (सापाची) पूजा करतात. साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. तो शेतामधील उंदीर व अन्य नासाडी करणाऱ्या छोट्या प्राण्यांपासून शेताचे रक्षण करतो. तसेच श्रावण महिन्यात पावसाचा जोर कमी झालेला असतो. साप बिळाबाहेर येतात. अशावेळी नागपंचमी सणामुळे लोक त्यांना मारत नाहीत तर त्यांची पूजा करतात. बरेच लोक नागाची मातीची छोटी मूर्ती आणतात. काहीजण पाटावर नागाचे चित्र काढतात. त्यादिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून नागाच्या मूर्तीची किंवा चित्राची पूजा करावी. त्याला दुधाचा नैवद्य दाखवावा. नागपंचमी च्या दिवशी काही लोक नागाला पकडून त्याला दूध पाजायचे. त्यामुळे अनेक नाग मृत्युमुखी पडायचे. काही समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे ही प्रथा बरीचशी बंद झाली आहे. बायका सापाच्या वारुळा जवळ जाऊन त्याची पूजा करतात. अशाप्रकारे नागपंचमी च्या सणाचे महत्व टिकून आहे. गोकुळाष्टमी गोकुळाष्टमी हा कृष्ण जन्म म्हणून साजरी केला जातो. हा हिंदूंचा महत्वाचा सण आहे. गोकुळाष्टमी हि श्रावण महिन्यात येते. कृष्णाला लोणी अतिशय प्रिय होते. तो मडक्यातून लोणी चोरायचा. त्याचे प्रतीक म्हणून या दिवशी मातीच्या मडक्यामध्ये दही, दूध भरून उंच दोरीवर बांधले जाते. तिथे पोहोचायला लोक मनोरा करतात, आणि ती दहीहंडी फोडतात. दहीहंडी फोडायची स्पर्धा भरते. आणि त्याला बक्षिस पण जाहीर केले जाते. या दिवशी लोणी आणि साखरेचा प्रसाद कृष्णाला दिला जातो. लोक कृष्णाची पूजा करतात. रात्री उशिरापर्यंत जगतात. आणि कृष्ण जन्माच्या वेळी प्रार्थना केली जाते. कृष्णाचा फोटो पाळण्यात ठेऊन त्याला झोका दिला जातो. लोक भजने, गाणी गातात. भागवतगीतेचे पारायण करतात. अशाप्रकारे गोकुळाष्टमी ही संपूर्ण भारतभर विविधप्रकारे साजरी केली जाते. गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्यात येतो. हा हिंदूंचा महत्वाचा सण आहे. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. म्हणजे या दिवशी आपल्याला काही शुभ करण्यासाठी मुहूर्ताची गरज लागत नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करावे व गुढी उभारावी. त्यासाठी काठीला स्वच्छ करून तिला हळद, चंदन लावून तिच्यावर नवीन कापड (सोवळे), फुलांची माळ, बत्त्याशाची (साखरेची) माळ व एक गडू (तांब्या) बांधून, सजवून त्या गुढीला सूर्योदयापासून सूर्यास्तहोईस्तोवर घरावर उभी करावी. विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभारतो. या दिवशी प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून, चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येस परत आले. त्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली गेली. त्या आनंदाचे प्रतीक म्हणून आपण दाराला तोरणे बांधतो, गुढी उभारतो. गुढीपाडवा हा मराठी वर्षांचा पहिला सण असून त्याचे अनन्य महत्व आहे. लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात चिखली गावी २३ जुलै १८५६ साली झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. लहानपणापासूनच ते अतिशय हुशार आणि स्वाभिमानी होते. एकदा शाळेत वर्गात मुलांनी शेंगांची टरफले टाकली आणि गुरुजींनी जेव्हा टिळकांना विचारले कि ही टरफले कोणी टाकली तेंव्हा त्यांनी चहाडी करणार नाही म्हणून सांगितले आणि जेव्हा गुरुजींनी शिक्षा म्हणून टिळकांना तीच टरफले उचलायला सांगितली तेव्हा ते उत्तरले कि "मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही". पुढे टिळकांचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयांत झाले. देशसेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. जनजागृती साठी त्यांनी केसरी व मराठा हि दोन वृत्तपत्रे सुरु केली. इंग्रजांनी त्यांच्यावर खटला भरविला तर त्यांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अशी सिंहगर्जना केली. त्यांना मांडले येथे कारागृहात टाकले. लोकांना एकत्र आण्यासाठी त्यांनी गणेश चतुर्थी आणि शिवजयंती हे दोन उत्सव सुरु केले. टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. जनतेने त्यांना प्रेमाने 'लोकमान्य' हि पदवी दिली. १ ऑगस्ट १९२० साली त्यांचा मृत्यू झाला. लोकमान्य टिळक हे भारताच्या इतिहासातील एक महत्वाच्या व्यक्ती आहेत.
नमुना उत्तरपत्रिका


Grade 4 Grade 5